Wednesday, 21 January 2009

परत भेट - भा गो मावलंकर (माझे पापा)

अनेकांच्या गर्दित
दूर दूर असलेले
नसून असल्या सारखे
जरी पडदया मागे गेलेले

पपा मला भटेले;
पुनः पुन्हा ! पुनः पुन्हा !

ताई च्या मौनातून
माई च्या बोलान्यातून
अक्का च्या करण्यातून
उज्जवल च्या अश्रुतून

पपा मला भेटले
पुनः पुन्हा ! पुनः पुन्हा!

मित्रांच्या आठ्वानित
सुरांमधे भिजताना
कळत- नकळत काकाच्या
हळूच जवळ येताना

पपा मला भेटले;
पुनः पुन्हा! पुनः पुन्हा!

आईच्या स्पर्शातून
भावनांच्या समुद्रात!

म्हणाले हास pampush
मी आहे सुखात!

पपा मला भेटतील
पुनः पुन्हा! पुनः पुन्हा!

जसराज च्या संगीतातून
जी ऍ नच्या लिखानातून
पुनः एकदा बोलतील
गदिमांच्या शब्दातून

पपा मला भेटतील
ही वेड़ी नाही आशा ...

खात्री केली आहे मी
आई च्या श्वासातून
पुनः पुन्हा! पुनः पुन्हा !